दिव्यांग नागरिकांसाठी शिधापत्रिका वाटप शिबिर
दिव्यांग नागरिकांसाठी शिधापत्रिका वाटप शिबिर संपन्न

नाशिक: नाशिक जिल्हा अन्न धान्य पुरवठा विभाग मार्फत दिव्यांग नागरिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या परिजनसाठी एक अभिनव उपक्रम राबवला जात असून त्या उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक दीव्यांग व्यक्तींनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी घ्यावा असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे नाशिक जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तीसाठी आयोजित सार्वजनिक शिधापत्रिका वितरण आणि मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
नाशिक जिल्हा पुरवठा विभागामार्फत दर गुरुवारी विशेष करून खास दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत शिधापत्रिका वितरण आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते. यात शिधा पत्रिका संबंधित सर्व तक्रारी सोडवणे, शिधा पत्रिकेतील नाव कमी करणे किंवा वाढवणे , शिधा पत्रिकेत दुरुस्ती करणे, नवीन शिधा पत्रिकेसाठी अर्ज स्वीकार करणे, नवीन शिधा पत्रिकेचे वितरण करणे आदी सर्व बाबी एकच छताखाली केले जात आहेत त्याचा संपूर्ण नाशिक जिल्यातील प्रत्येक तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींनी पुरेपूर लाभ घ्यावा असे जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी सांगितले.
गुरुवारी आयोजित या शिबिरात अनेक दिव्यांग व्यक्तींना नवीन पिवळ्या शिधा पत्रिकेचे वितरण करण्यात आले. तसेच अनेकांचे नवीन अर्ज स्वीकारून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रसंगी धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव, संगायो चे शहर तहसीलदार ऊषाराणी मॅडम, सांगायोचे शहरी विभागाचे तहसीलदार मयुरी आंधळे मॅडम, पुरवठा निरीक्षक विलास कनोजे, सहायक महसूल अधिकारी शांताराम मोंढे, महसूल सहायक प्रभाकर कादे, महसूल सहायक शोभा सापटे, सहायक पराग आमले, तसेच अनिल आठवले आदींनी उपस्थित दिव्यांगांना मार्गदर्शन आणि मदत करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.
दुपारी जेवणासाठी सुद्धा सुट्टी न करता कर्मचारी वर्गाने मदत आणि मार्गदर्शन कार्य केल्याने उपस्थिप शेकडो दिव्यांग आणि त्यांच्या परिजनांनी आनंद व्यक्त करून कर्मचाऱ्यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.