प्रतिनिधी विलास भालेराव.
(भगुर) शिक्षण मंडळ संचलित एकनाथ शेटे महाविद्यालयात पालक शिक्षक मेळावा संपन्न झाला कार्यक्रमात विद्यार्थ्यांसंबंधीत विविध विषयावर पालकांशी विचारविनिमय करण्यात आला आणि नूतन वर्षाची पालक शिक्षक समिती स्थापन करण्यात आली या समितीच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृत्युंजय कापसे तर उपाध्यक्षपदी जयराम चव्हाणके सचिवपदी प्रा.अश्विनी ठाकरे यांची निवड करण्यात आली. सदस्यांमध्ये संजय काळे, सयाजी गायकवाड, सुरेखा कोरडे आणि शिक्षक सदस्य म्हणून डॉ.राजू सानप, पुनम मगर, रोहिणी जगताप, यांची निवड करण्यात आली तसेच वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापिका अश्विनी ठाकरे यांनी पालकांना पालक शिक्षक मेळाव्याचा उद्देश सांगितला तसेच प्लेसमेंट संदर्भात माहिती दिली.विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पुनम मगर यांनी दैनंदिन महाविद्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला डॉ.राजू सानप यांनी महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल पालकांना माहिती दिली. प्रा. पूनम रैसवाल यांनी पालकांना येणाऱ्या परीक्षे संदर्भात माहिती दिली. उपस्थित भारती मुठाळ यांनी पालक म्हणून आपली असलेली जबाबदारी व तुकाराम पाटोळे यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक व पालकांचे योगदान याबद्दल आपले मनोगत मांडले.तर सूत्रसंचालन प्रा. रोहिणी जगताप यांनी केले आभार प्रा.मेघा काळे यांनी मानले.