भगुर देवळाली कॅम्प येथे विजयादशमी निमित्त पथसंचलन संपन्न.
भगुर देवळाली कॅम्प येथे विजयादशमी निमित्त पथसंचलन संपन्न.
प्रतिनिधी विलास भालेराव.
देवळाली कँम्प विजयनगर भगूर येथे राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे वतीने विजयादशमी निमित्त प्रमुख कार्यकर्तेनी उत्साहात सघोष पथ संचलन केले
दरवर्षी प्रमाणे सकाळी ७ वाजता मातोश्री लाँन्स येथे
लाठ्याकाठ्या घेऊन संघाचे कार्यकर्ते एकत्रित आले
त्यानंतर विश्वहिंदु परिषदेचे वरीष्ठ प्रमुख एकनाथ शेटे
यांच्या हस्ते भगवा झेंडा वंदन आणि पुजन करण्यात आले त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात संचालन केले
यामध्ये भगूर विजयनगर मधील मातोश्री लाँन्स पासून
सुरुवात करून आहुजा काँम्पलेक्स भारत पेट्रोल पंप
तुळजाभवानी माता मंदिर एकता डेअरी सत्यविनायक
हाऊसिंग सोसायटी शहा गार्डन शेळके मळा अशा
मार्गाने शिस्तबद्ध पद्धतीने संचालन करीत शेवटी
मातोश्री लाँन्स वर समाप्ती केली आणि संचलनात
मुख्य शिक्षक तानाजी पांडुरंग करंजकर प्रखंड मत्री
चद्रशेखर ओहळ केंद्रीय सल्लागार समिती प्रशांत गर्जे शहर व्यवस्था प्रमुख,रोहित सावंत पर्यावरण जिल्हा
प्रमुख तानाजी भोर मा.नगरसेवक,भगवान कटारिया
विश्वहिंदु परीषद भगूर अध्यक्ष संदीप शेटे भाजप शहरप्रमुख प्रसाद आडके,आरएसएस लहवित प्रमुख
संदीप मुठाळ जितेंद्र भावसार,अनिल कवडे,,सचिन पाटील,मोहन पाटील मंगेश देशमुख,,ललित भदे,जितेंद्र जाधव,सचिन चंद्रात्रे,प्रमोद शेटे, मयूर शेटे, साहिल शेटे,अनंत पवार,नारायण इनामदार उपस्थित होते.