भगुर दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी स्वीप कार्यक्रम अंतर्गत मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.
जि प शाळा भगुर व जि प शाळा उर्दू एकत्र रॅली काढण्यात आली.
शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हातात फलक घेवून भागुर शहरातील रस्त्यांवर फेरी काढून मतदान करण्या बाबत जनजागृती केली.
पालकांना मतदान जनजागृती निमित्त कार्ड वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे उषा सैंदाणे, सुरैया शेख मॅडम, संजय वाघ, सोनाली गवळी मॅडम, महेश सारुक्ते तसेच जिल्हा परिषद उर्दु शाळेचे सईदा आम्रिन फातिमा, अर्शिन आलिम शेख आदी शिक्षक उपस्थित होते.