ज्ञानमाता सेवाभावी संस्थेच्या पाठपुराव्याला यश. – केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी घेतली तक्रारीची दखल
ज्ञानमाता सेवाभावी संस्थेच्या पाठपुराव्याला यश. - केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी घेतली तक्रारीची दखल
प्रतिनिधी संतोष विधाते.
पुणे.
संस्थेचे संस्थापक अब्राहाम आढाव यांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन नंबर 22226 सोलापूर- मुंबई या गाडीने पुणे ते मुंबई हा प्रवास दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी केला होता.
सदर ट्रेन मध्ये अतिरिक्त ब्रेकफास्ट 120रू. देऊन घेतला होता. त्यावेळी IRCTC विक्रेता याच्याकडे बिलाची मागणी करण्यात आली होती. तसेच रेल्वेच्या कोच मध्ये onBoard जेवन ची मागणी केल्यास 50 र वेगळे सेवा शुल्क आकारण्यात येईल अशी सूचना देण्यात आली होती.
बिलाची मागणी करून ही बिल न दिल्याने तसेच प्रवासाचे सर्वाधिक जास्त दर या ट्रेन ला आकारात असताना जेवणासाठी अतिरिक्त 50 रू शुल्क का द्यावे.
याविषयी ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष यांनी सस्थेचे लेटर हेड वापरून थेट मा. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिनांक 17 सप्टेंबर रोजी तक्रार दखल केली.
रेल्वे मंत्री यांनी वंदे भारत च्या ट्रेन तक्रारी ची दखल घेतली असून व्यापक जनहिताचा विचार करून तक्रारदारास चौकशी करून योग्य न्याय दिला आहे.
वंदे भारत ट्रेन मध्ये ग्राहकाला बिल न देणाऱ्या
IRCTC विक्रेता एम. एस. ब्रांदावन यांना दंड लावला असून.
रेल्वे बोर्डाने जेवणासाठी अतिरिक्त 50₹ सेवा शुल्क घेणे बंद केले आहे.
यामुळे अनेक प्रवासी यांना याचा फायदा होणार आहे.
संस्थेच्या कायदेशीर पाठपुराव्यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. विक्रेता यावर दंडात्मक कारवाई झाल्याचे तसेच 50रू अतिरिक्त सेवा शुल्क न आकारण्याचे पत्र तक्रार दारास रेल्वे अधिकृत अधिकारी यांचेकडून प्राप्त झाले आहे.