बेकायदेशीर खाणप्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी कर्नाटक येतील कारवार अंकोला विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस आमदार सतीश सैल यांना अटक केली.
आमदार सतीश सैल यांच्या मालकीच्या कंपनीविरुद्ध 2013 मध्ये सीबीआयने प्रथम माहिती अहवाल दाखल केला. 2009 च्या सुरुवातीपासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर मे 2010 च्या दरम्यान राज्यातील अवैध उत्खनन आणि खनिज वाहतुकीची चौकशी सुरू झाली. यावेळी सीबीआयने नोंदवलेल्या पाच स्वतंत्र एफआयआरमध्ये आमदार सतीश सैल यांच्या मालकीच्या मल्लिकार्जुन शिपिंग प्रा. लि.’ या कंपनीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सीबीआयने आरसी 16 ‘ए’ नावाने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, ‘ आमदार सतीश सैल यांच्या मालकीच्या कंपनीने आठ महिन्यांच्या कालावधीत बेलिकेरी येथून सुमारे 7.23 लाख मेट्रिक टन धातू विदेशात निर्यात केल्याचे दिसते’.
या अगोदर देखील त्यांना या प्रकरणात अटक होवून जेलमध्ये राहावे लागले होते.
आरोप काय आहे?:
सरकार द्वारे फक्त 38.22 मेट्रिक टन खनिज विदेशात पाठवण्याची परवानगी दिलेली असताना 2009 ते 2010 दरम्यान बेलेकेरी बंदरातून सुमार 73 कंपन्या मार्फत 88.06 लाख मेट्रिक टन येवढे खनिज विदेशात पाठवण्यात आले होते असे सीबीआय अहवालात सांगण्यात आले आहे. जवळपास 50 लाख टन खनिज अवैध मार्गाने विदेशात पाठवण्यात आलेलं आहे.त्या पैकी 7.23 लाख मेट्रिक टन खनिज सतीश सैल यांच्या मालकीच्या मल्लिकार्जुन शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी द्वारे अवैध रीत्या विदेशात पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झालेलं आहे.
काँग्रेस पक्षाशी संबंध:
आमदार सतीश सैल हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. पण त्या वेळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. पक्ष सोडल्यानंतरही सतीश सैल यांचे काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध होते. 2009 ते 2011 दरम्यान कर्नाटक येथील बेल्लारीतील बेकायदेशीर खाणकामाने अनेकांना आकर्षित केले. “यावेळी, कारवारमधील प्रभावशाली सतीश सैल देखील अवैध खनिज वाहतूक व्यवसायात उतरले होते. त्या नंतर त्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिले होते आणि ते सध्या काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत.