LocalSocial

महावितरण कंपनी बळीराजाच्या मुळावर ?

दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे विजे अभाव हाल.

दिंडोरी प्रतिनिधी संतोष विधाते

दिंडोरी तालुक्यात गेल्या सात ते आठ दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकुळ घातलेला असताना त्यात महावितरण कंपनीकडून अतिरिक्त भारनियमन होत असल्याने फवारणीसाठी सुद्धा शेतकरी वर्गाला पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी हैराण झाले आहे.

परतीच्या जोरदार पावसामुळे पिकांची नुकसान होत असताना आहे ते पिके वाचविण्यासाठी रासायनिक औषधाची फवारणी करावी लागते मात्र सकाळी सात वाजताच महावितरण कंपनीकडून अघोषित भारनियमन केले जात आहे. सध्या सर्वत्र खरिप हंगाम जोरात चालू आहे. त्यात संवेदनशील समजल्या जाणा-या द्राक्ष पिकानां फवारणी अंत्यत आवश्यकता असते परंतु विजपुरवठा खंडित झाल्यामुळे सर्वत्र द्राक्ष बागायदारामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

तालुकयातील जवळ जवळ सर्वच विज उपकेंद्रात अतिरिक्त भार नियमन केले जात आहे.सध्या तालुक्याच्या सर्वच परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पिकांना पाणी देण्याची आवश्यकता नाही.त्यात सर्वच विज उपकेंद्रावर लोड सुद्धा नाही तरी सुद्धा भारनियमन केले जात असल्यामुळे हे शेतकरी वर्गाच्या भावनांशी खेळल्या सारखे आहे.या भारनियमन संदर्भात संबधीत उपकेंद्र, तसेच दिंडोरी व नाशिक कार्यालयातील महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता वरूणच आम्हाला भारनियमनाच्या संदेश येतो त्यांमुळे भारनियमन करावे लागते मात्र यावर वरिष्ठ अधिकारी तोडगा काढण्यास तयार नाही.

त्यांत महावितरण कंपनीकडून तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस पडत असतानाही भारनियमन केले जात आहे. त्यामुळे वाडी वस्त्यांवर राहणाऱ्या जनतेचे विजे अभावीमोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे दिंडोरी तालुका बिबट्यांचे माहेरघर बनल्यामुळे सायंकाळी सहा वाजेपासूनच बिबटे बाहेर पडण्यास सुरुवात होते अशी सर्व परिस्थिती असताना सुद्धा व महावितरणला वारंवार माहितीदिलेली असताना सुद्धा वरिष्ठ पातळीवरून याची दखल घेतली जात नाही म्हणजेच कुठेतरी महावितरण कंपनी शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असल्याचे सध्यातरी दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!