वाहनांना हाई सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदत वाढ.
वाहन धारकांना दिलासा

सुरक्षेच्या दृष्टीने १-०४-२०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना हाई सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करून महाराष्ट्र सरकारच्या परिवहन विभागाने 31 मार्च पर्यंत सर्व वाहनांना हे नंबर प्लेट बसविण्याची अन्यथा 31 मार्च नंतर जुन्या नंबर प्लेट असलेल्या वाहन धारकांकढून दंड वसूली करण्याचे आदेश काढले होते . पण आता हाई सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदत वाढ करून अध्यादेश काढल्याने वाहन धारकांना दिलासा मिळाला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव 1 एप्रिल 2019 या तारखेच्या आधी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली (एचएसआरपी) पाटी बसवण्यासाठी अध्यादेश जारी करून ते काम करण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत मुदत दिली होती. तसेच त्या पट्यांच्या वेगवेगळ्या राज्यातील भाव आणि महाराष्ट्रात घेण्यात येत असलेल्या सर्वात जास्त भावामुळे सार्वजनिक क्षेत्रात उलट सुलट चर्चा सुरू असल्या मुळे वाहन धारक नागरिक संभ्रमात होते
पण आज पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेल्या पाट्या वाहनांना लावण्याचे काम खूपच कमी प्रमाणात झालेलं असून 31 मार्च 2025 पर्यंत ते पूर्ण होणे अशक्य वाटत असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त श्री विवेक भिमनवार यांनी 20 मार्च रोजी नवीन परिपत्रक जारी करून हे उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट लावण्यासाठी अजून तीन महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे.
आता वाहनधारक 30 जून 2025 पर्यंत आपल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली पाटी बसवू शकतात. 30 जून नंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी नसलेले वाहने आढळल्यास त्यांना दंड भरावा लागणार आहे.
तरी सुद्धा उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेल्या पाट्या बसवण्यासाठी असलेल्या दरात कपात करावी अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.