देवळालीत सहा अर्ज अवैध; १८ इच्छुकांचे अर्ज वैध
देवळालीत सहा अर्ज अवैध; १८ इच्छुकांचे अर्ज वैध
नाशिक : देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बुधवारी झालेल्या उमेदवार अर्ज छाननीमध्ये सहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले असून, १८ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण २४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी शर्मिला भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया राबविण्यात आली.
यावेळी इच्छुक उमेदवार मंदार हेमचंद्र धिवरे, रवी केशव बागुल, योगेश ऊर्फ योगेश्वर प्रभाकर घोलप, शिरीष देवा प्रधान, संजय चांगदेव कुन्हाडे, स्वप्निल संजय धनगर या सहा जणांचे उमेदवारी अर्ज विविध कारणांवरून अवैध ठरविण्यात आले. तर आमदार सरोज आहिरे, मोहिनी गोकुळ आधव, योगेश बबनराव घोलप, राजश्री हरिश्चंद्र अहिरराव, राजू यादव मोरे,
अविनाश निरंजन शिंदे, विनोद संपत गवळी, अमोल संपतराव कांबळे, कृष्णा मधुकर पगारे, तनुजा बबनराव घोलप, दिलीप अबळाजी भोरे, प्रकाश भीकचंद दोंदे, भारती राम वाघ, रविकिरण चंद्रकांत घोलप, रामदास दयाराम सदाफुले, लक्ष्मी रवींद्र ताठे, सुनील नामदेव कोथमिरे, संतोष शंकर साळवे या अठरा जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. माघारीच्या मुदतीपर्यंत ‘किती जणांकडून अर्ज मागे घेतले जातात याकडे आता या मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.