जानोरी विद्यालयाचे उपशिक्षक बापू दिवे यांना कार्यक्षम गुरुकुल प्रमुख पुरस्कार.
जानोरी विद्यालयाचे उपशिक्षक बापू दिवे यांना कार्यक्षम गुरुकुल प्रमुख पुरस्कार.
संतोष विधाते दिंडोरी प्रतिनिधी.
जानोरी येथील महात्मा फुले विद्यालयातील उपशिक्षक बापू दिवे यांना रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मा.भास्करराव गलांडे पाटील कार्यक्षम गुरुकुल प्रमुख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातून बापू दिवे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला होता या पुरस्काराचे वितरण रयत शिक्षण संस्था सातारा कर्मवीर समाधी परिसर येथे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हा. चेअरमन ॲड. भगीरथजी शिंदे, माजी चेअरमन डॉ.अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, उच्च माध्य. सचिव डॉ.ज्ञानदेव म्हस्के आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. याप्रसंगी उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथजी बोडके, विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदलाल निकम, स्थानिक स्कूल कमिटी व्हा.चेअरमन सोपानराव राहाणे, मधुकर घुमरे, उपशिक्षक सुरेश पवार, शांताराम खैरनार आदी उपस्थित होते. दिवे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल महात्मा फुले विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन शंकरराव काठे, सदस्य,शाळा व्यवस्थापन व विकास समिती अध्यक्ष,सदस्य, ग्रामस्थ विद्यालयातील सहकारी शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.