नाशिक जिल्ह्यात कुणा मध्ये रंगणार निवडणुकीतील प्रमुख सामना ??
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024
नाशिक
विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असतानाच आता या निवडणुकीच्या धर्तीवर अनेक राजकीय समीकरणं तयार होताना दिसत आहेत. यापैकी काही समीकरणं जुनीच असली तरीही काही समीकरणं मात्र नव्यानं साकार होतांना दिसत आहेत.
अशा या विधानसभेच्याच रणधूमाळीत प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही तुल्यबळ लढती होणार आहेत, ज्यावर मतदारांसमवेत राजकीय वर्तुळाचंही लक्ष असेल. नाशिकमध्ये अशा नेमक्या कोणत्या लढती आहेत ज्यांच्याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिलं?
यांदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात महायुतीमध्ये सर्वाधिक जागा अजित पवार गटाला तर, महाविकास आघाडीकडे सर्वाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाला असतील. ज्यामुळं प्रमुख लढत या दोन पक्षांमध्येच पाहायला मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील प्रमुख लढती खालील प्रमाणे.
इगतपुरी
महायुती – हिरामण खोसकर ( अजित पवारांची राष्ट्रवादी )
महाविकास आघाडी – लकी जाधव ( काँग्रेस )
निर्मला गावित- बंडखोर नेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष.
सिन्नर
महायुती – माणिकराव कोकाटे ( अजित पवारांची राष्ट्रवादी )
महाविकास आघाडी – उदय सांगळे ( शरद पवारांची राष्ट्रवादी)
येवला
महायुती – छगन भुजबळ ( अजित पवारांची राष्ट्रवादी )
महाविकास आघाडी – माणिकराव शिंदे ( शरद पवारांची राष्ट्रवादी )
कुणाल दराडे- बंडखोर नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
नांदगांव
महायुती – सुहास कांदे ( शिंदेंची शिवसेना )
महाविकास आघाडी – गणेश धात्रक ( ठाकरेंची शिवसेना )
अपक्ष – समीर भुजबळ ( बंडखोर )
मालेगाव बाह्य
महायुती – दादा भुसे ( शिंदेंची शिवसेना )
महाविकास आघाडी – अद्वय हिरे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
बागलाण
महायुती – दिलीप बोरसे ( भाजप )
महाविकास आघाडी – दीपिका चव्हाण ( राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष )
दिंडोरी
महायुती – नरहरी झिरवाळ ( राष्ट्रवादी AP)
महाविकास आघाडी – सुनीता चारोस्कर ( राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष )
अपक्ष – धनराज महाले ( बंडखोर )
देवळाली
महायुती – सरोज अहिरे ( राष्ट्रवादी AP )
महाविकास आघाडी – योगेश घोलप
मोहिनी जाधव- मनसे
नाशिक पूर्व
महायुती – ऍड राहुल ढिकले ( भाजप )
महाविकास आघाडी – गणेश गीते (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
मनसे – प्रसाद सानप
नाशिक मध्य
महायुती – देवयानी फरांदे ( भाजप )
महाविकास आघाडी – वसंत गीते ( ठाकरेंची शिवसेना )
अपक्ष – हेमलता पाटील ( बंडखोर )
मनसे – अंकुश पवार
नाशिक पश्चिम
महायुती – सीमा हिरे ( भाजप )
महाविकास आघाडी – सुधाकर बडगुजर ( ठाकरेंची शिवसेना )
मनसे – दिनकर पाटील ( बंडखोर )
परिवर्तन महाशक्ती – दशरथ पाटील
चांदवड
महायुती – डॉ राहुल आहेर ( भाजप )
महाविकास आघाडी – शिरीषकुमार कोतवाल ( काँग्रेस )
अपक्ष – केदा आहेर ( बंडखोर )
कळवण
महायुती – नितीन पवार ( राष्ट्रवादी AP)
महाविकास आघाडी – जे पी गावित ( माकप )
निफाड
महायुती – दिलीप बनकर ( राष्ट्रवादी AP)
महाविकास आघाडी – अनिल कदम ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
मालेगाव मध्य
महायुती – ( उमेदवारी निश्चित नाही )
महाविकास आघाडी – एजाज बेग अजीज बेग ( काँग्रेस )
एमआयएम – मौलाना मुफ्ती इस्माईल
समाजवादी पार्टी – शान ए हिंद निहाल अहमद