आड बुद्रुक ग्रामपंचायतीत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या संगनमताने साडेअकरा लाखांचा अपहार .
आड बुद्रुक ग्रामपंचायतीत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या संगनमताने साडेअकरा लाखांचा अपहार .
दिंडोरी प्रतिनिधी संतोष विधाते
पेठ तालुक्यातील बु. ग्रामपंचायत येथील 15 व्या वित्त आयोगातील अपहर प्रकरणी पंचायत समितीच्या चौकशी समितीने केलेल्या प्रत्यक्ष पाहणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात 15 व्या वित्त आयोगातील एकही काम केलेले नसून यातील सुमारे 11 लाख 68 हजार 48 रुपयांचा अपार ग्रामसेवक व सरपंच यांनी संगणमताने केला असल्याचे तपासणी दरम्यान उघडकीस आले आहे.
ग्रामसेविका भारती भास्कर गांगोडे यांनी कामाचे अंदाजपत्रके मूल्यांकने नमुना नंबर 12 नमुना नंबर 15 नंबर 22 मासिक सभा ग्रामसभा येथील दप्तर चौकशीसाठी उपलब्ध करून दिले नाही त्यामुळे या कालावधीत मासिक सभा ग्रामसभा झाल्याचे सिद्ध होत नसल्याने तसेच आड येथील सार्वजनिक मुतारी सौचालय, शाळा शौचालय, स्टॅन्ड पोस्ट, सार्वजनिक विहीर परिसर तार कंपाऊंड संरक्षण जाळी, इंधन विहीर, हौद बांधणे, मेडिक्लोर खरेदी, डस्टबिन खरेदी, अंगणवाडीतील मुलांना गणवेश, ग्रामस्थांचा अभ्यास दौरा आधी कामे ग्रामपंचायतच्या मासिक सभेवर कधीही घेतलेली नाहीत सदर कामासाठी केलेला सर्व खर्च ग्रामपंचायत सदस्यांना माहित नाही उपसरपंच व सदस्य यांची मंजुरी किंवा सहमती घेतलेली नाही असे तक्रारदार यांनी त्यांचे जबाब नमूद केले आहे.
बांधकाम विभागात 349025, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील 673474 व 15 व्या वित्त आयोगातील निधी अंतर्गत 145249 रुपयांचा अपहार केला असल्याचा ग्रामसेविका व सरपंच हे दोघे प्रशासकीय व आर्थिक अनियमितता संशयित अपरास समप्रमाणात जबाबदार असल्याचा चौकशी अहवाल विस्तार अधिकारी ग्रा.पं. सहाय्यक अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा सहाय्यक अभियंता ई व द आपले सरकार सेवा केंद्राची तालुका व्यवस्थापक या चौकशी समितीने गटविकास अधिकारी यांना दिला आहे. 15 व्या वित्त आयोग निधी कामातील अनियमिततेबाबत सरपंच घनश्याम रामदास महाले व ग्रामसेविका भारती भास्कर गांगोडे यांना गटविकास अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
*कसा झाला आहे अपहार*
सार्वजनिक विहीर कोबा करणे-6500, मोटर खरेदी-50000, हातपंप मोटर दुरुस्ती-55000, वैयक्तिक नळ कनेक्शन-171000, जि प शाळा नळ कनेक्शन-6774, इंधन विहीर-72000, सार्वजनिक विहीर परिसर तार कंपाऊंड-75000, सार्वजनिक विहीर 129000, सार्वजनिक विहीर खोलीकरण-50000, मेडिक्लोर खरेदी-15000, डस्टबिन खरेदी-25000, अंगणवाडीतील मुलांना गणवेश-20000, हँडवॉश स्टॅन्ड-2213, पेपर ब्लॅक बसवणे-50000, शेतकरी अभ्यास दौरा-25336, कचराकुंडी-35000, असा सुमारे 1167048 रुपयांचा अपार झाला आहे.
आड बु. ग्रामपंचायत येथील 15 वित्त आयोगातील भ्रष्टाचाराच्या प्राप्त तक्रारीवरून पंचायत समितीच्या चौकशी समितीने चौकशी अहवाल सादर केला आहे याबाबत सरपंच व ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.भ्रष्टाचार प्रकरणी संबंधितांवर काही कारवाई होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.