National

तोफ प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्नीविरांचा मृत्यू.

तोफ प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्नीविरांचा मृत्यू.

प्रतिनिधी विलास भालेराव

देवळाली कॅम्पमध्ये सरावादरम्यान तोफेचा बॉम्बगोळा फुटल्याने २ अग्निवीरांचा मृत्यू
भगूर(विलास भालेराव) प्रशिक्षित अग्निवी जवानांच्या लष्करी
तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चितस्थळी न जाता तो जागेवस्व फुटल्याने झालेल्या स्फोटात दोन अग्रिवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक अग्रिवीर गंभीर र जखमी झाला आहे. भारतातील अग्रिवीरांच्या सरावादरम्यान झालेल्या मृत्युची नोंद आहे.,
याबाबत देवळाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास इंडियन शिल्ड गन या मैदानावर फायर रेंज आर्टिलरी येथे अग्निवीरांचा सराव सुरू होता. या सरावादरम्यान बारा
तोफा लावून त्यावर प्रत्येकी सात अग्निवीर गोळा फेकून आपले लक्ष्य भेदत होते. त्याच सुमारास तोफ नंबर ४ च्या तोंडी गोळा टाकला आणि तो गोळा फायर के ल्यानंतर लक्ष्य केलेल्या ठिकाणी न जाता तोफेपासून काही अंतरावर तो गोळा खाली पडला व त्याचा जागीच स्फोट झाला.
या स्फोटात गोहिल विश्वराज सिंग (वय २०, मूळ रा. गुजरात, ह. मु. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड), शक्किन शीत (वय २१, मूळ रा. पश्चिम बंगाल, ह. मु. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अप्पाला स्वामी (वय २०)हा जखमी झाला असून, या अग्निवीरावर सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक लाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहेत असून, अधिक तपास पोलीस कॅम्प उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!