पेठ येथील आड ग्रामस्थांचा लक्षवेधी आंदोलनाचा पवित्रा
पेठ येथील आड ग्रामस्थांचा लक्षवेधी आंदोलनाचा पवित्रा
दिंडोरी प्रतिनिधी संतोष विधात’
पेठ तालुक्यातील आड ग्रुप ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगातील कथीत भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरुद्ध ग्रामस्थांनी आवाज उठवला होता.दि.25 सप्टेंबरला पेठ पंचायत चौकशी समितीकडून आड येथे विकास कामांची पाहणी करण्यात आली होती परंतु पंधरा दिवस उलटूनही चौकशी अहवाल मिळत नसल्याने आड ग्रामस्थांनी लक्षवेधी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून प्रशासनाकडून तातडीने अहवाल देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पेठ तालुक्यातील ग्रामपंचायत आड येथे दिनांक 18 सप्टेंबरला ग्रामसभा घेण्यात आली होती यात पंधराव्या वित्त आयोगातील विकास कामे न करता सरपंच व ग्रामसेवक यांनी लाखोचा निधी हडप केल्याची बाब ग्रामस्थांनी उघडकीस आणली होती. यात ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले असल्याने याप्रकरणी चौकशी व्हावी म्हणून ग्रामस्थांनी दिनांक 19 सप्टेंबरला गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
निवेदनाची त्वरित दखल घेत, पेठ प्रशासनाकडून चार अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 25 सप्टेंबरला ग्रामस्थांना सोबत घेऊन विकास कामांची स्थळ पाहणी केली. यात समितीला कोणत्याही प्रकारचा विकास दिसून आले नाही. सरपंच आणि ग्रामसेवक यांनी 15 व्या वित्त आयोगातील कामासाठी लाखो रुपये खर्च केले. परंतु विकास कामे कोणतीच झाली नसल्याने समिती आणि ग्रामस्थांना प्रत्यक्ष स्थळी दिसले. मोठ्या प्रमाणात निधीचा गैरवापर झालेले असताना चौकशी समिती अहवाल देण्यात टाळाटाळ का करीत आहे याची विचारणा आठ ग्रामस्थांनी पेठ पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे. प्रत्यक्ष चौकशी समितीकडून विकास कामांची पाहणी होऊन 15 दिवस उलटूनही ग्रामस्थांना चौकशी अहवाल मिळत नाही. आज देतो उद्या देतो दोन दिवसांनी देतो अशी थातूरमातूर उत्तरे अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे यामुळे महाराष्ट्र निर्भय पार्टी व आड ग्रामस्थ यांचे तर्फे पेठ पंचायत समिती समोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन गट विकास अधिकारी पेठ पोलीस स्टेशन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे नामदेव, गावित चंदर गायकवाड, सत्यभामा भागे, निवृत्ती महाले, सुदाम महाले, पांडुरंग ठाकरे, सविता भोये, रमेश ठाकरे, देवराम कांमडी, चंद्रकला महाले आदी उपस्थित होते.