पारोळा एरंडोल मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डॉ.संभाजीराजे पाटील यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता
पारोळा एरंडोल मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डॉ.संभाजीराजे पाटील यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता
जळगांव प्रतिनिधी.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पारोळा एरंडोल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डॉ.संभाजीराजे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता मानली जात आहे. सद्या या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे चिमणराव पाटील हे आमदार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतर राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही मोठी फूट पडून दोन गट पडले.यातच या मतदारसंघात तीन वेळा आमदार व पालकमंत्री राहिलेले डॉ.सतीश पाटील हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातच राहिले.मात्र अश्यातच डॉ.संभाजीराजे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करून पारोळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या घड्याळाची टिक टिक सुरू ठेवली.व तेही या मतदारसंघात आमदारकीचे इच्छुक उमेदवार म्हणून तयारीला लागले.महिनाभरातच राज्य विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.यावर भाजप,शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती कायम राहील असे दिसते.आता मतदारसंघ कोणाला मिळावेत यावरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे.भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौर्यापूर्वी नुकताच एक अंतर्गत सर्व्हे घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.यामध्ये महायुतीकडून ज्या दोन तीन नावांचा सर्व्हे झाला यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉ.संभाजीराजे पाटील यांच्या बाजूने सर्व्हेचा सर्वाधिक कल असल्याचे समजते.यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पारोळा एरंडोल मतदार संघावर दावा सांगितला जातोय.तसे झालेच तर मतदारसंघात डॉ.संभाजीराजे पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे विधानसभेतील नवे शिलेदार असतील हे निश्चित मानले जात आहे.